मुंबई : कायम वादाचं मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना राणौत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अत्महत्येनंतर चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती बुधवारी मुंबईत दाखल झाली आहे. मात्र महापालिकेने तिच्या कर्यालयातील बेकायदा बांधकामावर केलेल्या कारवाईमुळे तिला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून सतत ट्विट करत ती शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत असल्याचं दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सर्व प्रकार संविधानाचे अपमान करत असल्याचं ती एका ट्विटमध्ये  म्हणाली आहे. 'ज्या विचारांवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना निर्माण केली. तेच विचार विकून आज शिवसेना फक्त सत्तेसाठी सोनिया सेना झाली आहे.' अशी टीका कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून केली. 



शिवाय याठिकाणी देखील तिने घराणेशाहीचा उल्लेख केला. 'तुमच्या वडिलांचे कर्म तुम्हाला पैसा आणि वारसा हक्क देवू शकतो. मात्र सन्मान तुम्हाला स्वतःला कमवावा लागेल. माझं तोंड बंद कराल. पण त्यानंतर उमटणारे पडसाद कसे बंद कराल', तुम्ही किती जणांचं तोंडं बंद करणार? किती जणांचे आवाज दाबणार? असे प्रश्न देखील तिने उपस्थित केले.



सत्यापासून कधीपर्यंत पळवाट काढणार अखेर एक दिवस सत्य सर्वांसमोर येईल. तुम्ही आहात कोण? असा प्रश्न उपस्थित करत 'घराणेशाहीचा केवळ एक नमुना' असल्याचं वक्तव्य कंगनाने केलं आहे.