...म्हणून कंगनाने पंजाबी अभिनेत्रीला केलं ब्लॉक
कंगना सातत्याने ट्विट करत असते. मात्र, तिने केलेले ट्विट तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत.
मुंबई : नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकणारी अभिनेत्री कंगना रानौत आणि पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानामध्ये (Himanshi Khurana) चांगलीचं जुंपली आहे. कंगना रनौत ( Kangana Ranaut) ट्विटरवर खूपच सक्रिय आहे. ती सातत्याने ट्विट करत असते. मात्र, तिने केलेले ट्विट तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. तिने केलेल्या एक ट्विटवर हिमांशीने रिट्विट केले. ते ट्विट कंगनाला अवडलं नसल्यामुळे तिने चक्क हिमांशी खुरानाला ट्विटवरून ब्लॉक केले आहे.
सध्या दिल्लीत शेतकरी आंदोलन (Farmers Protest ) सुरु आहे. हे आंदोलन गेल्या सहा दिवसांपासून सुरु आहे. त्यावर कंगना म्हणली की, 'सध्या शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येक जण आपलं स्वार्थ साधत आहे.' तिच्या अशा ट्विटनंतर पंजाबी कलाकारांनी तिच्यावर निशाणा साधत नाराजी जाहीर केली.
कंगनाच्या या ट्विटवर हिमांशी खुरानाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, '...तर आता कंगना नवीन प्रवक्ती आहे. गोष्टी वाईट मार्गने कशा पुढे करता येतील हे हिच्याकडून शिकायला हवं..म्हणजे लोक काही वाईट करतील.. त्याआधीच कारणे पसरवायची की दंगल का होईल...'
त्यानंतर हिमांशीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'कंगनाने ब्लॉक केलं..' असं लिहिलं होत. दरम्यान, शेतकरी आंदोलनात एक वयोवृद्ध महिला सहभागी झाली आहे. या वृद्ध महिलेची तुलना दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनात सहभागी झालेल्या बिलकिस आजींसोबत केली. याबाबत अभिनेत्री कंगना रनौतला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.