कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम
कंगना राणौत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय?
मुंबई: मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या कंगना राणौतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारल्यानंतर भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा तिच्या मदतीला धावून आले आहेत. राम कदम यांनी गुरुवारी ट्विट करून म्हटले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेनेतील एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा कंगना राणौतला धमकावण्याचे दु:साहस केले आहे. कंगना राणौतने मुंबईत येऊ नये, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले. मात्र, कंगना राणौत मुंबईत आल्यास महाराष्ट्र सरकारला भीती वाटण्याचे कारण काय? कंगना ही सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुंतलेले राजकारणी, नेते, अभिनेते अशा सगळ्यांचा पर्दाफाश करायला तयार आहे. तिच्या या साहसाचे स्वागत करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार तिला धमकी देत आहे, असे कदम यांनी म्हटले.
ही तर बेईमानी... ; कंगना राणौतला संजय राऊतांनी सुनावलं
कंगना राणौतच्या मुखातून ही नावे निघाल्यास महाराष्ट्र सरकारच अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून तिला धमकी दिली जात आहे. परंतु, कंगना राणौतही झाशीची राणी आहे. ती शिवसेना नेत्यांच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नाही, असे राम कदम यांनी म्हटले.
कंगना, तू खरंतर राम कदमांना घाबरायला पाहिजेस- सचिन सावंत
तत्पूर्वी कंगना राणौत हिनेही ट्विट करून संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तिने म्हटले की, शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे, असा सवाल यावेळी कंगनाने उपस्थित केला.