ऋतिकच्या फेसबूक पोस्टवर कंगनाच्या बहिणीचं प्रत्युत्तर
कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहेत.
मुंबई : कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहेत. यावादावर आत्तापर्यंत कंगनानं ऋतिकवर जोरदार निशाणा साधला होता. कंगनानं सिमरन या तिच्या चित्रपटावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋतिकला लक्ष्य केलं होतं.
कंगनाच्या या टीकेला ऋतिकनं फेसबूक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. आता ऋतिकच्या या फेसबूक पोस्टवर कंगनाची बहिण रंगोलीनंही प्रतिक्रिया दिली आहे. रंगोलीनं ऋतिक आणि कंगनाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. कंगनाच्या कंबरेवर हात ठेवलेला हा तू नाहीस का? असा सवाल रंगोलीनं विचारला आहे.
दरम्यान मी आणि कंगना फक्त दोघंच कधीही भेटलो नाही. एवढ्या दोन मोठ्या व्यक्तींचं अफेअर ७ वर्षांपर्यंत कोणालाच कसं माहिती नव्हतं, असा सवाल ऋतिकनं या फेसबूक पोस्टमध्ये विचारला आहे.
माझ्या पासपोर्टवर जानेवारी २०१४ नंतर भारताबाहेर गेल्याची कोणतीही माहिती नाही. पण मी पॅरिसमध्ये जाऊन साखरपुडा केल्याचं बोललं गेलं. या तथाकथित नात्याबाबत एकच पुरावा आहे, तो म्हणजे फोटोशॉप केलेला एक फोटो. माझ्याकडे ३ हजारांपेक्षा जास्त एकतर्फी मेल आहेत. हे मेल मी आणि त्या महिलेनं पाठवलेले आहेत. सायबर सेल याबाबतचं सत्य कधीही समोर आणू शकतं, असं ऋतिक म्हणालाय.