मुंबई : देशातचं नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. या धोकादायक विषाणूच्या विळख्यात फक्त सामान्य लोक सापडले नसून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना करोनाची झळ बसली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता, दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सर्जा आणि त्याची पत्नी प्रेरणा शंकर यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. ध्रुव सर्जा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 



'माझ्या पत्नीला आणि मला करोनाची लागण झाली आहे. आमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या आम्ही दोघंही रुग्णालयात अॅडमिट आहोत. ' असं तो ट्विटमध्ये म्हणाला आहे. शिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन करत त्यांने सर्वांना काळजी घेण्यासाठी सांगितले आहे. 


दरम्यान, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत, 20783 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 9,68,876 वर पोहचली आहे.