Kantara Collection : ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आला आहे. काही दिवसांपूर्वी 'Kantara' ने बनवलेला 'KGF' ला मागे टाकून 'KGF Chapter 2' नंतर कन्नडमधील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा करणरा चित्रपट ठरला. दिवाळी वीकेंड मुळे चित्रपटाचे कलेक्शन खूप वाढलं होतं. चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 400 कोटींवर पोहोचलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साउथ चित्रपट 'कंतारा'मधील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे. आश्चर्याचीबाब म्हणजे साऊथचा अभिनेता ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने 400 कोटींची कमाई केली आहे.


साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. रिलीज होऊन सुमारे 40 दिवस उलटूनही 'कंतारा' चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना सतत आकर्षित करत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आता ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा'ने जगभरात 400 कोटींचा व्यवसाय करून इतिहास रचला आहे.


400 कोटींच्या क्लबमध्ये 'कंतारा'चा समावेश
30 सप्टेंबर रोजी कन्नड भाषेत 'कंतारा' रिलीज झाला. चित्रपटाने सुरुवातीपासूनच दाक्षिणात्य भाषेत अप्रतिम कामगिरी केली. हे लक्षात घेऊन 14 ऑक्टोबरला 'कंतारा' हिंदीतही सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि हिंदी पट्ट्यातही 'कंतारा'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन करून सर्वांनाच चकित केलं.


ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी मंगळवारी सोशल मीडियावर 'कंतारा'च्या जगभरातील कलेक्शनची ताजी आकडेवारी जाहीर केली. तरणच्या मते,  'कंतारा'ने जगभरात 400 कोटींची कमाई करून एक नवा विक्रम केला आहे.


या शहरात 'कांतारा'ने केली ईतकी कमाई
कर्नाटक- 168.50 करोड
आंध्र प्रदेश-तेलंगाना- 60 करोड
तमिलनडु- 12.70 करोड
केरल-19.20 करोड
उत्तर भारत-96 करोड