Kantara च्या हिंदी रिमेकमध्ये कोणता अभिनेता दिसणार? ऋषभ शेट्टीचं स्पष्टीकरण
सिनेमा प्रदर्शित होवून एक महिना उलटला असाला तरी सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.
Kantara : साऊथचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'कंतारा' (kantara new movie) 30 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होवून एक महिना उलटला असाला तरी सिनेमाची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सिनेमा कोट्यवधींचा गल्ला जमा केला आहे. प्रेक्षकांमध्ये सिनेमाची चर्चा पाहता Kantara चा बॉलिवूड रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार का आणि आला तर कोणता बॉलिवूड अभिनेता मुख्य भूमिकेत दिसेल? यावर दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने स्पष्टीकरण दिलं आहे. (kantara rishab shetty)
रिमेक बनला तर मुख्य भूमिका कोण करणार?
Kantara सिनेमाच्या रिमेकबद्दल ऋषभ शेट्टी म्हणाला, 'सिनेमा हिंदी भाषेत डब झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा सिनेमाचं रिमेक बनवण्याच्या कोणत्याही विचारात नाही.' शिवाय सिनेमाचा रिमेक तयार होत असेल तर, कोणता बॉलिवूड अभिनेता मुख्य भूमिकेत दिसेल?
या प्रश्नावर ऋषभ म्हणाला, 'सिनेमाचा हिंदी रिमेक होणार नाही. सिनेमातील अभिनेत्याची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तुम्ही तुमच्या मुळाशी आणि संस्कृतीशी जोडलेले असणं महत्त्वाचं आहे. बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मला आवडतात. पण सिनेमाचा रिमेक व्हावा असे ऋषभ शेट्टीला वाटत नाही.
दरम्यान 30 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा 14 ऑक्टोबरनंतर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता ऋषभ शेट्टीचं सर्वत्र कौतुक होतं आहे.