Kantara Movie : सध्या बॉक्स ऑफिसवर दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) यांच्या 'कांतारा' सिनेमाचा बोलबाला असल्याचं दिसतंय. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले असतानाच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमध्ये कांतारा सिनेमा (Kantara Movie) पाहता पाहता एका प्रेक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली. राजशेखर नावाचा एक व्यक्ती नागमंगला याठिकाणी असणाऱ्या व्यंकटेश्वरा थिएटरमध्ये कांतारा पाहण्यासाठी गेले होता. राजशेखर मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले (Man Dies While Watching Kantara Movie).


राजशेखर यांचं वय 45 वर्ष होतं. सिनेमाला जाण्याआधी ते पुर्णपणे ठणठणीत होते, अशी माहिती त्यांच्या कुटूंबियांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी नागमंगला पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणात आणखी माहिती घेत असल्याचं दिसतंय.


आणखी वाचा - Kantara: कमाईच्या बाबतीत ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा'ने रचला इतिहास


दरम्यान, कांतारा सिनेमावरून वाद निर्माण झाला होता. सिनेमामध्ये दाखवण्यात आलेल्या विधी परंपरा आणि देवता हिंदू संस्कृतीची भाग नसल्याचा आरोप करण्यात आला होता. कंताराने KGF ला मागे टाकून KGF Chapter 2 नंतर कन्नडमधील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा करणरा चित्रपट ठरलाय. दिवाळी वीकेंडमुळे चित्रपटाचे कलेक्शन खूप वाढलं. चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 170 कोटींवर पोहोचलं आहे.