Kanye West : अमेरिकीतील रॅपर कान्ये वेस्टवर रोज नव नवीन आरोप करण्यात येत आहेत. आता त्याची माजी मॅनेजर लॉरेन पिसियोटानं त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यात लैंगिक अत्याचारासोबतच अनेक मोठे दावे केले आहेत. लॉरेन पिसियोटानं हे आरोप केले की सीन 'डिडी' सोबत एका स्टुडियो सेशल दरम्यान, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. पिसियोटाचं म्हणणं आहे की कान्ये वेस्टनं तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिक्स केले आणि त्यानंतर तिच्यावर नशेच्या अवस्थेता लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तिनं हा देखील दावा केला की कान्येनं त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी बियांका सेंसरीची आई अर्थात त्याच्या सासूसोबत लैंगिक संबंध ठेवायचे होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉरेन पिसियोटा 2021 ते 2022 पर्यंत कान्ये वेस्टची असिस्टंट होती. PEOPLE मॅगझीननं पिसिकोटाकडून दाखल केलेल्या याचिकेतून हा खुलासा केला आहे. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की पिसियोटानं तिच्या तक्रारित दावा केला आहे की कान्ये वेस्ट ज्या लोकांसोबत संबंध ठेवायचा, त्याला त्या महिलांच्या आईसोबत देखील शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा होती. 


लॉरेन पिसियोटा ही ओनली फॅन्स मॉडेल देखील होती. तिनं दाखल केलेल्या याचिकेत तिनं आरोप केले की कान्ये वेस्टनं कॅलिफोर्नियामध्ये सीन 'डिडी' कॉम्ब्ससोबत एक स्टूडियो सेशल दरम्यान, तिच्या ड्रिंक्समध्ये एक औषध मिक्स केलं आणि त्यानंतर तिच्यावर हानामारी केली. तिनं दावा केला की रॅपरनंच तिच्यासाठी ती ड्रिंक मागवली होती. जी प्यायल्यानंतर तिला शुद्ध नव्हती. काही काळानंतर मला कसं तरी वाटू लागलं. माझं शरीरावरचा आणि बोलण्यावर असलेला ताबा गमावू लागले होते. जेव्हा मी उठली तेव्हा मला काही आठवत नव्हतं. पण मला खूप लाज वाटत होती. त्यानं माझा लैंगिक छळ केला होता. लॉरेन पिसियोटाप्रमाणे, त्याच्या काही काळानंतरच तिला कंपनीतून काढून टाकण्यात आलं, 


कान्ये वेस्टची पूर्वाश्रमीची पत्नी बियांका सेंसरीच्या आईचं नाव अॅलेक्झॅंड्रा सेंसरी आहे. पिसियोटाचा दावा आहे की 2022 मध्ये बियांकाशी लग्न करण्याआधी तिची आई अॅलेक्झॅंड्रा रॅपर कान्ये वेस्टची 'ऑन-कॉल सेक्स पार्टीचा भाग होती.' लॉरेन पिसियोटानं 28 सप्टेंबर 2022 ला केलेल्या एका कथित मेसेजचा उल्लेख केला, जो कान्येनं त्याची पत्नी बियांकाला पाठवला होता. त्यात लिहिलं होतं की 'मी तुझ्या आईसोबत लैंगिक संबंध ठेवायचे आहेत. तिच्या ऑस्ट्रेलिया जाण्याआधी. माझी इच्छा आहे की तू मला आणि तुझ्या आईला हे सगळं करताना पहावं.'


हेही वाचा : अमिताभ बच्चन यांची हेअरस्टाईल करतानाची पोस्ट; संतप्त नेटकरी म्हणाले, 'बॉलिवूडवर शोककळा आणि तुमचं...'


दरम्यान, असं म्हटलं जातं की कान्ये वेस्टनं 2014 मध्ये किम कर्दाशियनशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याच वर्षी कान्येनं बियांका सेंसरीशी लग्न केलं. दोन दिवस आधीच कान्ये वेस्टवर त्याच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींची हेरगिरी करण्याचा आरोप लागला होता.