कॉमेडियन कपिल शर्माला रुग्णालयात केलं दाखल
कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कपिल शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लो बीपीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कपिल शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लो बीपीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.
कपिल शर्माची प्रकृती आता स्थिर आहे. पण अजून त्याला डिस्चार्ज नाही मिळाला आहे. बुधवार संध्याकाळी ४ वाजता त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर जवळच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात तो सहभागी होऊ शकणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.