नवी दिल्ली : कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा याच्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे आणि आपल्या उपचाराकरीता बंगळुरुत दाखल झाला आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कपिल शर्माचं नाव आता पून्हा एकदा चर्चेत आलं आहे.


डीएनए ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल आणि त्याची गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ यांच्यात ब्रेकअप झालं असून त्यांचं नातं संपुष्टात आलं आहे. काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने सोशल मीडियात गिन्नीचा फोटो शेअर करत तिच्यासंदर्भात सांगितलं होतं. इतकेच नाही तर वर्षाच्या शेवटपर्यंत दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.


गिन्नीपूर्वी कपिलचं नाव त्याच्याच टीममधील क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रीति सिमोन्ससोबत जोडलं गेलं होतं. मात्र, यासर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हणत कपिलने गिन्नीसोबतचं नातं सोशल मीडियातून समोर आणलं होतं.


कपिच्या जवळील एका व्यक्तीने सांगितलं की, सोशल मीडियात कपिलने गिन्नीसोबत लग्न करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर प्रीतिसोबतच्या नात्याच्या बातम्यांना पूर्ण विराम दिला. मात्र, आजही त्याच्या टीममधील एक महिला सदस्य सतत त्याच्याविरोधात काम करते.