Kapil Sharma Birthday Special :  लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचा (Kapil Sharma) आज 42 वा वाढदिवस आहे. कपिल त्याच्या शोमध्ये सगळ्यांना हसवताना दिसतो. कपिलचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. त्याचे परदेशातही अनेक शो होतात. कधी काळी कपिलनं त्याच्या करिअरची सुरुवात ही 500 रुपयानं केली होती. तर आज कपिलची 300 कोटींची संपत्ती आहे. कपिलकडे आज 300 कोटींची संपत्ती असली तरी सुद्धी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यानं खूप स्ट्रगल केलं आहे पण एक दिवस असा होता जेव्हा चित्रपट अपयशी झाला म्हणून कपिलनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलनं त्याच्या कॉमेडीच्या करिअरमध्ये यश मिळवलं होतं. पण त्यानं बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला होता. पण असं काही झालं की कपिल डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याची परिस्थिती अशी झाली होती की त्यानं आत्महत्या करण्याचा विचार केला होता. याशिवाय कपिलला मद्यपानाचे व्यसन लागले होते. एकदा तर मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला होता. त्याची पत्नी गिन्नी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबानं तिला या सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी मदत केली. 



हेही वाचा : अंबानींची सून Radhika Merchant चा नाद खुळा! छोट्या पर्सच्या किंमतीत तुम्ही खरेदी कराल 1BHK फ्लॅट


कपिलनं 2015 साली प्रदर्शित झालेल्या किस किसको प्यार करूं या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 2017 साली त्याचा फिरंगी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. इतकंच काय तर त्यानं स्वत: या चित्रपटाची निर्मिती केली होती. कपिलनं 33 कोटी इन्व्हेस्ट केले होते. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही तर फ्लॉप झाला. या अपयशाला कपिल सहन करू शकला नाही. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याच्या मेंटल हेल्थवर इतका परिणाम झाला होता की तो खूप मद्यपान करू लागला आहे. घराच्या चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेतले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्यानं आत्महत्या करण्याचा विचार केला होता. तो त्याला काय वाटतं हे कोणाला सांगतही नव्हता. जेव्हा चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा तो कोणाला भेटायलाही घाबरायचा. पण त्याच्या कुटुंबाच्या मदतीनं तो या सगळ्यातून बाहेर पडला. 


अमिताभ बच्चन यांच्या समोर गेला होता मद्यपान करून


'फिरंगी' या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी व्हॉइस ओव्हर द्यावा अशी कपिलची इच्छा होती. त्यासाठी त्यानं अमिताभ यांना विनंती केली होती. अमिताभ तयारही झाले. त्यांनी कपिलला सांगितलं की मी उद्या एका चित्रपटासाठी व्हॉइसओव्हर देण्यास जाणार आहे. तर तू तिथे तुझी टीम पाठव त्यावर कपिलनं असा विचार केला की बिग बी इतकं करत आहेत तर आपणच तिथे जायला हवं. मग दुसऱ्या दिवशी अमिताभ ज्या स्टुडिओमध्ये ते रेकॉर्डिंग करत होते. तिथेच कपिल त्याची पत्नी गिन्नीला घेऊन गेला. पण अमिताभ यांना भेटायला जाण्याआधी कपिलनं मद्यपान केले होते. अमिताभ यांना गिन्नीची ओळख करून देताना कपिल म्हणाला ही तुमची सून आहे. त्यानंतर कपिलला असं वाटलं की तो काही चुकीचं बोलला आहे. त्यानं बिग बींची माफी मागितली होती.