नवी दिल्ली : अभिनेता कपिल शर्मा लवकरच त्याच्या चाहत्या तरूणींचं हृद्य घायाळ करणार आहे. कपिल शर्मा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल लवकरच त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्न करण्याची घोषणा करू शकतो. गिन्नीचे परिवारवाले तिच्यावर लवकर लग्न करण्यासाठी दबाव टाकत आहे. कुटुंबियांचं म्हणनं आहे की, तिने लवकरात लवकर कपिलसोबतच्या रिलेशनशिपला ऑफिशिअल केलंय. तेच दुसरीकडे कपिलची आईचीही तिच इच्छा आहे. कपिलच्या आईला गिन्नी खूप पसंत आहे. पण गिन्नी कपिलसमोर लग्नासाठी एक अट ठेवली आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, गिन्नीचं म्हणनं आहे की, कपिलसोबत लग्न तेव्हाच करेन जेव्हा कपिल दारू सोडेल. चर्चा आहे की, कपिलने गिन्नीचं म्हणनं ऎकून दारू पिणे सोडले आहे. या महिन्यात कपिल शर्माचा ‘फिरंगी’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. बोलले जात आहे की, फिरंगीच्या रिलीजनंतर कपिल लग्न करणार आहे. 



याआधी कपिलने एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने गिन्नीसोबतचा फोटो शेअर करून पोस्टही लिहिली होती. ‘मी हे नाही म्हणणार की, बेटरहाफ आहे...ती मला पूर्ण करते...लव्ह यू गिन्नी...कृपया तिचं स्वागत करा...माझं तिच्यावर खूप प्रेम आहे’.