मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन केले. यावेळी बॉलिवूड आणि टिव्ही जगातील अनेक मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.कॉमेडी स्टार कपिल शर्माने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. कपिल शर्माने फोटोच्या कॅप्शनमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला भेटून चांगले वाटले, देश आणि फिल्मी दुनिया कशा प्रकारे चांगली प्रगती करु शकते याबद्दलचे तुमचे विचार मला खूप आवडले.माला फक्त एवढेच म्हणायचे आहे की तुमच्या कडे कुशल बुध्दिमत्ता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सिनेमांना सामाजीक बदलाचा आरसा असल्याचे सांगितले. समाजात होत असलेल्या सामाजीक बदलांना सिनेमांसोबत जोडले जाते.भविष्यात होणाऱ्या बदलांचा अनुमान सिनेमांच्या माध्यामातून लावला जावू शकतो.भारतात विभीन्न बोली-भाषा बोलणारे लोक राहतात सिनेमा या सगळ्या संस्कृतींना एकत्र घेवून येतात. संस्कृतीचा वाढत असलेला प्रभावामुळे पर्यटनाला प्रेरणा मिऴते आणि रोजगाराची संधी वाढते.


त्याचप्रमाणे भारतीय सिनेमे जगभरात आपल्या  देशाचे प्रतिनिधित्व करते.बहेरच्या लोकांना भारताचा आरसा दाखवते. आपले सिनेमे,संगीत,गाणे त्याचप्रमाणे आपले कलाकार विविध देशात आपल्या कामाची छाप ठेवतात. सिनेमाच नाही तर मालिकांनी सुध्दा चांगले काम केले आहे.  'क्योंकि सास भी कभी बहू थी','रामायण' या मालिकांना परदेशात फारच लोकप्रियता मिळाली.