मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये, कॉमेडियनने सारा अली खानच्या कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. कपिल शर्माने सारा अली खानला विचारलं की, अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' चित्रपटात काम करत आहेस तेव्हा तुझ्या कुटुंबातील कोणी सांगितलं नाही का?  हे काम काळजीपूर्वक कर, कुठेतरी तीर बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलच्या प्रश्नाला उत्तर देत सारा अली खान म्हणाली की, तिर-वीर असं कोणी बोलत नाही... सारा अली खान मग कपिलकडे बघते आणि म्हणते की, तूच असं बोलतोस, आमच्या घरचे लोक असं बोलत नाहीत.


कॉमेडी शोमध्ये सारा अली खान इतकं बोलताच कपिल शर्मा म्हणतो, तरीच तुमच्या घरातल्यांचा कोणाचा शो येत नाही. कपिल शर्माने हे बोलल्यानंतर सारा अली खान आणि अक्षय कुमार जोरजोरात हसू लागतात. कपिल शर्मा आणि सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 



कपिल शर्माने सारा अली खानला असंही विचारलं की, तिने पापा सैफ अली खानकडे अक्षय कुमारसोबत सेटवर काम करण्याच्या टिप्स मागितल्या का? जसं की, झोपू नका किंवा काहीही करू नका. सारा अली खानने उत्तर दिलं की, हे मला आधीच माहित होतं मात्र पापा म्हणाले होते की, अक्षय कुमारसोबत काम करणं खूप मजेदार असेल.