मुंबई : फोर्ब्सकडून टॉप इंडियन सेलिब्रिटींची २०१७ ची यादी जाहीर केली आहे. या यादीत गेल्या वर्षाप्रमाणेच सलमान खान २३२.८३ कोटी रूपयांची कमाई करत पहिल्या नंबरवर आहे. तर शाहरूख खान यादीत १७०.५० कोटींसोबत दुस-या स्थानावर आहे. या यादीत कपिल शर्मा याचाही समावेश आहे. पण त्याची रॅंकिंग यावेळी कमी झाली आहे. 


इतकी केली कमाई....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१६ मध्ये कपिल शर्मा या यादीत ११व्या नंबरवर होता. पण यावेळी तो चक्क १८व्या स्थानावर फेकला गेलाय. त्याने यावर्षी ४८ कोटी रूपयांची कमाई केली आहे. कपिलसाठी हे वर्ष तसं खूप कठिण राहिलं. वर्षाची सुरूवातच सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामुळे झाली. त्यामुळे शो बंद करावा लागला. त्यानंतर त्याचा ‘फिरंगी’ सिनेमा रिलीज झाला पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. तरीही या १०० सेलेब्सच्या यादीत तो १८व्या स्थानावर आहे. 


कोण किती नंबरवर?


या यादीत तिस-या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर अक्षय कुमार, सातव्या स्थानावर प्रियंका चोप्रा आणि ११व्या स्थानावर दीपिका पादुकोन ही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीत साऊथचा सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभास हा २२व्या स्थानावर आहे. प्रभास ३२.२५ कोटींच्या कमाईसोबत या यादीत आहे.