मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. 'द कश्मीर फाइल्स'च्या संदर्भात कपिलच्या शोवर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अनुपम खेर यांनी स्वत: या प्रकरणाबाबत खुलासा केल्यावर आता कपिल शर्माच्या अडचणी कमी झाल्या आहेत. त्यामुळे कपिल शर्मा सध्या आनंदी आहे. हा आनंद त्याने नुकताचं पोस्ट केलेल्या व्हिडीओमधून समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कपिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कपिल जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये, 'जेव्हा सकाळी 6ची शिफ्ट असेल, तेव्हा पहाटे 4 वाजता जीममध्ये जावं लागतं...' असं लिहिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या कपिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कपिल कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर असंख्य चाहते असणारा कपिल त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो.