cannes फेस्टिव्हलमध्ये दिसली गुत्थी...पंखांचा गाऊन पाहून हसू आवरणं कठीण
`द कपिल शर्मा शो`मध्ये धमाल करणारी गुत्थी म्हणजेच सुनील ग्रोवर नुकताच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसला
मुंबईः कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये गुत्थीची भूमिका साकारणाऱ्या सुनील ग्रोव्हरने स्वतःचा असा फोटो शेअर केला आहे की, हा फोटो पाहून तुमचेही मन थक्क होईल. सुनीलचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कोणालाही हसू आवरता येणार नाही.
सुनील ग्रोव्हरने नुकताच त्याच्या लोकप्रिय पात्र गुत्थीचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून लोकांच्या चेहऱ्यावरचा हसू थांबत नाहीये. या फोटोमध्ये सुनील ग्रोव्हरने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुत्थी हे पात्र दाखवले आहे.
सुनीलने एक दोन वेण्या असलेला मेकअपसह तिचा गुत्थीचा लुक मॉर्फ केला आहे. हा फोटो शेअर करत सुनील ग्रोव्हरने लिहिले - फ्रेंच रिव्हिएरा. लोक आता या फोटोवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करताना दिसत आहेत.
सुनील ग्रोव्हरने मॉर्फ केलेला फोटो तुर्की स्टार मरियम उजेरलीचा आहे. या ड्रेससाठी तिला बरीच प्रशंसाही मिळाली. आता सुनील ग्रोव्हरने हा लूक मॉर्फ केला आहे आणि त्यालाही त्याबद्दल चांगलीच पसंती दिली जात आहे.
हिना खानलाही आपले हसू आवरता आले नाही आणि हसणारा इमोजी बनवून तिने या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील ग्रोव्हर गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. तो 'भारत', 'गब्बर इज बॅक' आणि 'बागी'सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसला. याशिवाय तो अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला.
तो शेवटचा 'सनफ्लॉवर' वेब सीरिजमध्ये दिसला होता. या वेब सिरीजमधील अभिनेत्याचा अभिनय सर्वांनाच आवडला होता.