Kapil Sharma on fight with Sunil Grover : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘ज्विगाटो’ (Zwigato) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या कपिल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्तानं कपिल अनेक मुलाखती देत आहे. अशात त्यानं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत कपिलला त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या चित्रपटातील त्याचा सहकलाकार आणि लोकप्रिय कॉमेडीयन, अभिनेता सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या भांडणाविषयी विचारण्यात आले. त्यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्या दोघांनी एकत्र काम केले नाही. याविषयी कपिलनं आता त्याची बाजू मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल आणि सुनील ग्रोव्हर या दोघांमध्ये 2018 साली वाद झाला होता. त्यानंतर सुनीलनं ‘द कपिल शर्मा शो’ ला रामराम ठोकला. त्या दोघांमध्ये विमानात भांडण झाल्याचे म्हटले जाते. इतंकच काय तर कपिलनं सुनील ग्रोव्हरवर हाथ उगारला होता. या कारणामुळेच सुनीलनं शो सोडल्याचे म्हटले जात होते. आता त्या दोघांमध्ये झालेल्या भांडणावर मुलाखतीत कपिलनं त्याची बाजू मांडली आहे. कपिलनं खुलासा केला की त्याच्या तापट स्वभावामुळे सुनीलसोबत त्याचं भांडण झालं होतं.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


भांडणावर काय म्हणाला कपिल? 


'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला, "मी त्याच्यामुळे कधीच असुरक्षित वाटलं नव्हतं. उलटं मला आवडणाऱ्या लोकांना मी उंचावर नेलं. मी तापट स्वभावाचा होतो आणि हे मी मान्य करतो. मी रागिट होतो. मला राग आला की माझा स्वत: वरचा ताबा सुटायचा. पण आता मी बदललोय. लोक म्हणतात की माझे अनेक प्रतिस्पर्धी आहेत, पण माझी कोणाशीही स्पर्धा नाही. मी एकटाच आहे."


हेही वाचा : Swara-Fahad Reception : स्वरा-फहाद यांच्या रिसेप्शन पार्टीत दिग्गजांची उपस्थिती, Rahul Gandhi यांच्यासह पाहा कोण-कोण


कपिल पुढे म्हणाला, पाहिजे तर तुम्ही मला अहंकार असलेली व्यक्ती बोलू शकतात. त्याला विचारा की त्याला माझ्यासोबत काम न करण्याचे कारण काय? सुनील आणि माझ्यात वाद झाला होता, पण मी इतरांसोबत खूप चांगला होतो. दरम्यान, कपिल शर्मा आणि सूनील या दोघांच्या नात्यात सुधारणा झाली आहे. त्यांच्यातील दुरावा कमी होत आहे. जेव्हा सुनीलची बायपाय सर्जरी झाली होती तेव्हा कपिलनं त्याच्या आरोग्याची प्रार्थना करत असल्याचे म्हटले होते.