मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं तर त्यांची चर्चा तर होणारचं. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात नक्की काय होत आहे. या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तर दुसरीकडे धकाधकीच्या जीवनात दुःख विसरण्यासाठी कित्येक जण कॉमेडी शोचा आधार घेतात. अशा परिस्थितीत 'द कपिल शर्मा शो' प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणीचं आहे. आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना पोट धरून हासवणाऱ्या कपिलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कपिल लवकरचं त्याचा पहिला स्टँडअप कॉमेडी शो प्रेक्षकांसाठी घेवून येणार आहे. या शोचे नाव आहे 'कपिल शर्मा: आय एम नॉट डन येट’. शो नेटफ्लिक्सवर 28 जानेवारीला रिलीज होणार आहे.


कपिलच्या स्टँडअप कॉमेडी शोचा एक टीझर व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ स्वतः कपिलने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल त्याच्या एका ट्विटबद्दल मजेशीरपणे बोलत आहे, ज्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला होता.



व्हिडीओमध्ये कपिल शर्माने सांगितले की, त्याने BMC विरोधात एक ट्विट केलं होतं, जे त्याला महागात पडलं. कपिल हसला आणि म्हणाला, 'ट्विट केल्यानंतर मी ताबडतोब मालदीवला रवाना झालो... 


'हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी म्हणालो की मला एक खोली द्या जिथे इंटरनेट नसेल.त्यानंतर त्यांनी मला विचारलं, तुम्ही लग्न करून आलात, या प्रश्नाचं उत्तर देताना मी म्हणालो, ट्विट करून आलो आहे...'


कपिल शर्मा पुढे म्हणतो, 'जेवढे दिवस मी तिथे राहिलो, त्यासाठी 9 लाख रुपये खर्च आला. माझ्या आयुष्यात कधी मी शिक्षणावर एवढा खर्च नाही केला, तेवढा खर्च त्या एका ट्विटमुळे मला करावा लागला. त्यामुळे मला ट्विटरवर गुन्हा दाखल करायचा आहे.


काय आहे प्रकरण
कपिल ज्या ट्विटबद्दल बोलत आहे, ते ट्विट त्याने 2016 मध्ये बीएमसीविरोधात केलं होतं. ज्यामध्ये त्याने बीएमसी मुंबईने त्याच्याकडून लाच घेतल्याचे सांगितलं होतं. 'मी गेल्या 5 वर्षांपासून 15 कोटी कर भरत आहे, तरीही मला माझे कार्यालय उघडण्यासाठी बीएमसीला 5 लाखांची लाच द्यावी लागत आहे.'  कपिल शर्माच्या या एका ट्विटने चांगलाच खळबळ उडवून दिली.