नवी दिल्ली : कपिल शर्माच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा म्हणजेच 'फिरंगी' चा ट्रेलर लॉन्च झाला. यात कपिल इंग्रजांच्या काळातील गुलामाच्या रूपात दिसत आहे. ट्रेलरमध्ये कथा फ्लॅशबॅक मध्ये सुरु होताना दिसत आहे. ज्यात कपिल लहान मुलांना इंग्रजांच्या काळातील गोष्ट सांगत आहे. त्यात एक मुलगा आहे ज्याला इंग्रजांचे राज्य चुकीचे वाटत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक दिवशी त्याला आपल्या कर्तृत्वावर इंग्रजांकडे नोकरी मिळते. त्याचदरमान्य त्याचे गावातील एका मुलीवर प्रेम जडते. मात्र इंग्रजांकडे नोकरी करत असल्याने मुलीचे वडील लग्नासाठी विरोध करतात. असे कथानक असलेल्या या चित्रपटात कॉमेडी देखील आहे. परंतु, कपिलच्या आधीच्या चित्रपटापेक्षा काहीशी कमी. यात इशिता दत्ता देखील मुख्य भूमिकेत आहे. 



खुद्द कपिलने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव  धींगरा यांनी केले आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. मात्र १ डिसेंबरला पद्मावती चे प्रदर्शन असल्यामुळे कपिलच्या चित्रपटाला तगडी स्पर्धा आहे. परंतु, कपिलच्या हा ट्रेलर लोकांच्या पसंतीस उतरत आहे.