मुंबई : बॉलिवडूची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर खानच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी करिना विराजमान आहे. तिच्या फॅशन सेन्सकडे चाहत्यांच्या नजरा असतात. नुकत्याचं झालेल्या एका मुलाखती दरम्यान तिला मोठ्या पेचात टाकणारा प्रश्न विचारण्यात आला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचे उत्तर देखील तिने मोठ्या चतुराईने दिले आहे. 'कपूर' किंवा 'खान' या दोन आडनावांपैकी तुला एकाला निवडण्यास सांगीतले तर? 'मला एका नावाला निवडण्याची गरज नाही. कारण मी करिना कपूर खान आहे. मी स्वत:ला भाग्यशाली समजते की माझ्याकडे कपूर आणि खान हे दोन्ही नावं आहे.'


असं उत्तर करिनाने या मुलाखतीत दिलं आहे. करिना सध्या तिच्या 'गुडन्युज' चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात करिनीसोबत अभिनेता अक्षय कुमार देखील झळकणार आहे.