मुंबई : अभिनेत्री ममता कुलकर्णी आज रूपेरी पडद्यापासून जरी दूर असली, तरी एक चित्रपटामुळे ती कायम चर्चेत असते.  25 वर्षांपूर्वी ममता कुलकर्णी, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान 'करण अर्जुन' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. 'दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे' या सुपरहिट चित्रपटानंतर राकेश  रोशन निर्मित आणि दिग्दर्शित 'करण अर्जुन' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला. पण आज देखील चित्रपटाची चर्चा तुफान रंगलेली असते. चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता 49 वर्षांची झाली आहे.



49 वर्षांच्या ममताचं सौंदर्य अद्यापही अबाधित आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 'करण-अर्जुन' चित्रपटात तिची जोडी सलमान खानसोबत खूप गाजली होती. चित्रपटातील दोघांची अनेक गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. कारकिर्दीच्या शिखरावर असताना ममता अचानक चित्रपट जगतातून गायब झाली.