मुंबई : अनेक स्टारकिड्सनी यावर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. देओल कुटुंबातील तिसऱ्या पिढीनेही अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे. सनी देओल यांचा मुलगा करण देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. करण देओलच्या आगामी 'पल पल दिल के पास' या डेब्यू चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून यूट्यूबवर ट्रेंडिग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पल पल दिल के पास' या चित्रपटाचा टीझर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. चित्रपटाच्या टीझरलाही यूट्यूबवर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. टीझरमध्ये करण, जवळपास त्याच्या वडिलांप्रमाणेच दिसत आहे. या चित्रपटात करणला पाहून 'तेजाब'मधील सनी देओल यांची नक्कीच आठवण होईल.



'पल पल दिल के पास'मध्ये अभिनेत्री सहर बाम्बा भूमिका साकारणार आहे. 



या चित्रपटातून सनी देओल यांचा मुलगा करण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर सनी देओल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 


१९७३ मध्ये आलेल्या धर्मेंद्र यांच्या सुपरहिट 'ब्लॅकमेल' चित्रपटातील 'पल पल दिल के पास...' हे आजही लोकांच्या मनात कायम आहे. याच गाण्यापासून 'पल पल दिल के पास' या चित्रपटाच्या नावाची प्रेरणा घेण्यात आली. येत्या २० सप्टेंबर रोजी 'पल पल दिल के पास' चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.