मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा सध्या त्याच्या 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या टॉक शोमुळे चर्चेत आहे. करणच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. या शोमध्ये आलेले सेलिब्रिटी हे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे करताना दिसतात. नुकताच 'कॉफी विथ करण' चा 9 वा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. यावेळी अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि क्रिती सेननं (Kriti Sanon) हजेरी लावली होती. शोमध्ये दोघांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान, टायगरनं तो सार्वजनिक ठिकाणी कमांडो होऊन गेल्याचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिती आणि टायगर कॉफी बिंगो हा खेळ खेळत असताना, टायगरनं हा खुलासा केला आहे. करण टायगरला विचारतो की सार्वजनिक ठिकाणी तू कमांडो गेला आहेस. यावर उत्तर देत नेहमीच असं टायगर बोलतो. त्यानंतर करण त्याला विचारतो की तू आता Underware परिधान केली आहेस की नाही. त्यावर लाजत उत्तर देत टायगर बोलतो हो नाही तर ते विचित्र दिसलं असतं. टायगरनंतर बोलतो जिथे जमेल तिथे असाच जातो. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टायगरनं तो नेहमी Underware परिधान करत नाही हे मान्य केल्यानंतर करण म्हणाला, 'You just like everything to breathe...' हे ऐकल्यानंतर क्रिती लाजते आणि बोलते हे ऐकायला खूप विचित्र वाटतंय आणिमग टायगर आणि करण दोघांनाही हसू अनावर झालं. दरम्यान, नेटकऱ्यांना करणनं हा प्रश्न विचारनं आनडलं नाही. त्यांनी करणला Underwere चा प्रश्न कोण विचारतं? आणि डोकं ठिकाणावर आहे ना याचं अशा अनेक कमेंट करत ट्रोल केलं आहे.


एवढंच नाही तर टायगरनं त्याचा आणि दिशा पटानीचा ब्रेकअप झाल्याचं कबुल केलं आहे. त्याशिवाय त्याला श्रद्धा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये यायला आवडेल असं तो म्हणाला आहे.