मुंबई : काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनं (Katrina Kaif) तिचा वाढदिवस साजरा केला. कतरिना तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पती विकी कौशल आणि जवळच्या मित्रांसोबत एका ट्रिपवर गेली होती. या ट्रिपवर कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेल आणि धाकटी बहीण इसाबेल कैफही होती. याशिवाय या ट्रिपवर अभिनेत्री इलियाना डिक्रूझही (Ileana D'Cruz) दिसली. यावेळी इलियानाला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं होतं. 


आणखी वाचा : Pushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर इलियाना आणि कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियन रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी समोर आली. आता या गोष्टीला करण जोहरनं दुजोरा दिला आहे. 'कॉफी विथ करण 7' (Koffee With Karan 7) च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये करण इलियाना आणि कतरिनाच्या भावाच्या रिलेशनशिपवर बोलला आहे. 'मी मालदीव ट्रिपचे फोटो पाहिले होते आणि मी विचार करत होतो. मग मी म्हणालो बरं मी पार्टीत माझ्यासमोर या दोघांची भेट पाहिली. आम्हाला या गोष्टीला दुजोरा देण्याची गरज नाही.'



करणचं बोलणं ऐकून कतरिना हसायला लागली. यावर बोलताना कतरिना म्हणाली की, करणची नजर ही आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर असते. कतरिना फक्त तिच्या भावाच्या रिलेशनशिपवर नाही तर विकीसोबतच्या तिच्या लग्नावरही बोलली. (karan johar confirms ileana dcruz is dating katrina kaif s brother sebastian in koffee with karan 7) 


आणखी वाचा : 'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील


कतरिना आणि विकी हे दोघं डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्न बंधनात (Katrina Kaif and Vicky Kaushal Marriage) अडकले. त्यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. कतरिनाच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर कतरिना लवकरच 'फोन भूत' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ईशान खट्टर (Ishaan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) दिसणार आहेत.