मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) त्याच्या कॉफी विथ करण (koffee with karan) या त्याच्या शोमध्ये अनेक अभिनेता-अभिनेत्यांचे सीक्रेट बाहेर काढत असतो. मात्र प्रथमच आता करण जोहरचं सीक्रेट समोर आलं आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री त्याची क्रश होती, असा खुलासा त्याने केला आहे. ही अभिनेत्री कोण होती, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात ही अभिनेत्री कोण आहे ते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहर अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलला आहे. आता त्याने त्याच्या बॉलिवूड क्रशबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.  


करणने (Karan Johar) सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि डिझायनर, अनिता श्रॉफ अदजानिया यांच्या चॅट शो फीट अप विथ द स्टार्सवर त्याच्या डेटिंगबद्दल खुलासा केला. करणने सांगितले होते की, त्याला त्याच्या पार्टनरसोबत कम्फर्ट झोन डेव्हलप करायला आवडते. 


पुढे मुलाखतीत जेव्हा करणला विचारण्यात आले की त्याला कोणती अभिनेत्री आवडते. यावेळी क्षणाचाही संकोच न करता करणने सांगितले की, त्याला त्याची BFF करीना कपूरला आपली जीवनसाथी बनवायला आवडेल. तसेच त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होत. या त्याच्या खुलास्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.  


करण जोहर (Karan Johar) आणि करीना कपूर खान BFF आहेत. मात्र, काही वेळापूर्वीच करिनाने करण जोहरसोबतचे नऊ महिन्यांचे नाते संपुष्टात आणले. त्यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर काही वेळानंतर त्यांच्यातला वाद मिटला आणि ते पुन्हा बोलू लागले.  


दरम्यान करण जोहरने (Karan Johar) 1998 मध्ये रोमँटिक कॉमेडी-ड्रामा 'कुछ कुछ होता है'मधून करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि त्याचा फायदा करणला झाला. पुढे करणने कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, स्टुडंट ऑफ द इयर, ए दिल है मुश्किल असे सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले. केजोने अद्याप लग्न केलेले नाही आणि तो त्याच्या दोन मुलांचा रुही जोहर आणि यश जोहरचा एकुलता पिता आहे.