मुंबई: समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या कलम ३७७ रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने या निर्णयानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली. समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचा निर्णय म्हणजे मानवता आणि समानतेचा सर्वात मोठा विजय आहे. आज देशाला त्याचा श्वास परत मिळाला आहे, असे सांगत करणने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन समलिंगी व्यक्तींमध्ये असलेले लैंगिक संबंध हा गुन्हा नाही, असा निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. 


2013 मध्य़े सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवले होते. हा कायद्याने गुन्हाच आहे आणि त्यासाठी जन्मठेपेची तरतूद कायम असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर पुन्हा या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यामध्ये घटनेने दिलेल्या अधिकारांचा उल्लेख करण्यात आला होता.