Karan Johar: समलैंगिक संबंधांबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. Section 377 काढल्यानंतर, या ऐतिहासिक निर्णयानं समलैंगिक संबंध गुन्हा नाही यावर शिक्कामोर्तब केले आणि या समुदायातील नागरिकांची होणारी घुसमट काही अर्थी कमी झाली. परंतु अजूनही हवी तशी समाजमान्यता मिळणं हा एक मोठा टास्क आहे. त्यातून या समुदायातील लोकं या मुद्द्यावर अनेकदा स्पष्टपणे बोलताना दिसतात. यावेळी अभिनेता करण जोहर यानंही आपला एक अनुभव सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यावेळी त्यानं आपला शालेय जीवनातील अनुभवही शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यानं त्याचा हा अनुभव सांगताना शाहरूखचंही नावं घेतलं आहे. परंतु नक्की त्याचा याच्याशी संबंध आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. परंतु शाहरूख आणि करण जोहर हे खूप चांगले मित्र आहेत. कदाचित हा किस्सा वाचून तुंम्हाला त्या दोघांच्या मैत्रीचा अंदाज येईलच. 


आपलं गे आहोत किंवा आपण इतरांसारखे नाही, याची जाणीव स्वत:ला झाल्यावर फार त्रास होते. त्यातून आपल्या वाढत्या वयात आपल्याला ही गोष्ट समजणं त्यातून ती उमजण्यापर्यंतचा प्रवास हा खूप खडतर असतो. अशातच यातून होणारी घुसमट ही त्या सर्वांसाठीच फार कठीण असते. यावर करण जोहरनंही आपला अनुभव हा शेअर केला आहे. आज यशाच्या शिखरावर असलेल्या करणलाही अनेक विविध गोष्टींचा सामना हा करावा लागला आहे. यावेळी त्यानं यावर भाष्य केले आहे. 1995 पासून करण जोहर हे नावं प्रचंड गाजते आहे. त्याआधीही त्यानं अनेक हिंदी मालिकांमधूनही कामं केली आहेत. 


हेही वाचा : सनी देओलसोबत एकत्र दिसल्या डिंपल, अमृता सिंग; Ex-Girlfriends एकाचवेळी कशा धडकतात?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी निखिल तनेजाच्या 'बी अ मॅन यार' या शोमध्ये सहभाग दर्शवला होता. ''मी दहावी असताना एका मुलीसोबत प्रेमाचं नाटक केलं होतं. तिनं नाव शलाका होतं. आज आपण ज्याला गे, फाग, होमो ही नावं वापरतो, यालाच तेव्हाच्या काळी पैंसी असंही म्हटलं जायचं. हे खूप अपमानस्पद होतं आणि त्यातून मला हे सगळं काही गूढ अंधारात टाकणार होतं. पण शाहरूख खान हा मात्र असाच एक व्यक्ती आहे ज्यानं मात्र मला असं कधीच वाटू दिलं नाही.'', अशी आठवण त्यानं सांगितली. सध्या त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट जोरात चालतो आहे.