Yash Johar Last Letter : दोस्ताना, अग्निपथ, गुमराह, डुप्लिकेट, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. चित्रपटसृष्टीत कॉलेजमधील प्रेम नावाची संकल्पना रुजवण्याचं काम या चित्रपटांनी केलं. त्यामुळे 90 च्या दशकात कॉलेजमधील तरुण तरुणींमध्ये प्रेमांकूर फुटू लागले. या चित्रपटांच्या कथांना घरोघरो पोहचवण्याचं काम केलं ते धर्मा प्रोडक्शनने (Dharma Production)... बॉलीवूडचे सुप्रसिद्ध निर्माते यश जोहर (Yash Johar) यांनी 1979 मध्ये धर्मा प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड (Dharma Production Private Limited) या चित्रपट निर्मिती कंपनीची पायाभरणी केली. त्यानंतर त्यांचा मुलगा करण जोहरने (Karan Johar) मोठा फौजफाटा पुढे लोटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक वडिलांप्रमाणेच यश जोहर (Yash Johar) यांना मुलगा करण जोहरच्या (Karan Johar) भवितव्याची काळजी वाटत होती. खरंतर आपल्या मुलाला बिझनेसबद्दल काहीच माहीत नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं. म्हणूनच मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलासाठी काही पत्रं (Yash Johar Last Letter) लिहिली होती, ज्यांना करण जोहर आजही बायबल समजतो. या पत्रांमध्ये यश जोहरने आपल्या मुलासाठी काय लिहिलं होतं? याचा खुलासा करण जोहरने 19 वर्षांनंतर केलाय. (Karan Johar reveals his father Yash left him a letter about people to trust and those he should not marathi news)


वडिलांच्या निधनानंतर करण जोहर कंपनी कशी पुढे न्यायची, असा विचार करत होते. त्यांना चिंता लागून राहिली होती. त्यावेळी वडिलांच्या मित्राने करण जोहरच्या हातात काही पत्र दिली. सहा पानी पत्रात यश यांनी कुठं आणि किती गुंतवणूक केली आहे? निधी कुठून मिळणार? याचा हिशेब लिहिला होता. तर दुसऱ्या एका पत्रामध्ये कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेऊ नये, याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केलं होतं.


आणखी वाचा - 'वेड' सिनेमाने मोडले सगळे रेकॉर्ड; बजेटच्या दुप्पट केली कमाई


मी पैशांच्या व्यवहारापासून इतका दूर होता की, एकदा बँकेच्या चेकवर स्वाक्षरी करण्याऐवजी त्याने लॉट्स ऑफ लव्ह लिहिलं होतं, असं करण जोहर सांगतो. वडिलांच्या त्या पत्रामुळे आपला व्यवसाय पुढे गेला आणि आज कंपनीची एकूण संपत्ती 400 दशलक्ष म्हणजेच 3259 कोटी रुपये उलाढाल आहे, असं करण जोहरने म्हटलं आहे.


दरम्यान, कुछ कुछ होता है सिनेमामधून (Kuch Kuch Hota Hai) करण जोहरने एन्ट्री केली. त्याचा पहिलाच चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात त्याने लहान अंजलीच्या चिठ्ठ्यांचा सीन देखील करण जोहरने घेतला होता. त्यामुळे वास्तविक घटनाक्रमाला परीरूपी अभिनयाचं रूप देण्याचं काम करणने केलं, असं देखील म्हटलं जातं.