Varan Dawan च्या रिलेशनशिपवर करण जोहरचा धक्कादायक खुलासा
कॉफी विथ करणचा सीझन 7 (Coffee With Karan Season 7) सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
Varun Dhwan in Coffee with Karan: बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी आपल्या रिलेशनशिपवर (Bollywood Celebrity Relationships) मोकळेपणानं बोलताना दिसतात. लग्नाआधीही अनेकदा सेलिब्रेटी रिलेशनशिपला घेऊन तळ्यात मळ्यात असल्याचे पाहायला मिळते. आपण ज्या रिलेशनशिपमध्ये आहोत त्या रिलेशनशिपला घेऊन आपण पुढे जाऊ का? यावरही अनेक जण साशंक असतात. असाच एक बॉलीवूडचा सेलिब्रेटी (Bollywood Celebrity) आपल्या रिलेशनशिपला घेऊन साशंक होतो. (karan johar reveals on actor varun dhawan relationship with her wife natasha that he had several interaction with other girls)
कॉफी विथ करणचा सीझन 7 (Coffee With Karan Season 7) सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या शोच्या (Coffee With Karan Season 7 Episode 11) 11 व्या एपिसोडमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि वरूण धवल (Varun Dhawan) गेस्ट म्हणून आलेले होते. दरम्यान करण जोहरनं वरूण धवलच्या रिलेशनशिपवर (Varun Dhawals Relationships) धक्कादायक खुलासा केला आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये नेहमीच रिलेशनशिप्स, सेक्स आणि रॉमान्सवर सेलिब्रेटींकडून अनेक खुलासे होते असतात. यावेळी शोमध्ये आलेल्या वरूण धवनच्या रेिलेशनशिपवर करण जोहरनं त्याला प्रश्न विचारले.
करणने नताशाच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना वरूणला विचारले की नताशाशी लग्न करण्यापुर्वी किंवा तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना वरूण तिच्याशी लग्न करण्यावर ठाम नव्हता. आपल्यासाठी नताशा हाच जोडीदार योग्य आहे याचीही कल्पना वरूणला तेव्हा नव्हती. यावर वरूणला प्रश्न केला असताना करणने त्याला विचारलं की तु नताशाशी लग्न करण्याअगोदर आपल्या नात्याबद्दल बोलण्यासाठी तो अनेक मुलींशी संवाद साधायचा.. या प्रश्नाचं उत्तर देणं वरूणनं टाळलं परंतु वरूणनं आणि अनिल कपूर यांनी शो एन्जॉय केला.
2021 मध्ये वरूण धवल आणि नताशा दलालशी (Varun Dhawan and Natasha Dalal) लग्न केले. नताशा ही वरूणची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. ते दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. वरूणनं कॉफी विथ करणमध्ये सांगितले की नताशा ही त्याच्यासाठी नेहमी तत्पर राहते. नताशा कधीच फार काही मागण्या करत नाही पण तिला माझा वेळ हवा असतो.