मुंबई : 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' या सिनेमांच्या अफाट लोकप्रियतेनंतर साऊथचा सुपरस्टार प्रभासची डिमांड अधिकच वाढलीये. इतकंच नव्हे तर त्याला बॉलीवूडमध्येही काम करण्याच्या ऑफर्स येऊ लागल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासशी संबंधित एक बातमी आली होती की बॉलीवूडमध्ये करण जोहर त्याला लाँच करणार आहे. मात्र आता अशी बातमी आलीये की प्रभासची फी ऐकून करण अवाक झाला आणि त्याने आपले पाऊल मागे घेतले.


२० कोटी रुपयांची केली होती मागणी
डीएनएच्या बातमीनुसार, प्रभासने करणकडून २० कोटी रुपये मागितले होते. प्रभासची ही डिमांड ऐकून करण नाराज झाला आणि त्याने हे पाऊल मागे घेतले. प्रभासने मागितलेली रक्कम ही सुपरस्टार रजनीकांत सह इतर साऊथ कलाकारांच्या मानधनाच्या तुलनेत खूप जास्त आहे. 


करणने केले ट्वीट 


गुरुवारी करणने एख ट्विट केले होते. या ट्विटवरुन करण अप्रत्यक्षपणे प्रभासला मेसेज देऊ पाहतोय. 


बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनमध्ये वितरक होता करण


बाहुबलीच्या हिंदी व्हर्जनमध्ये करण वितरक होता. सध्या प्रभास आपल्या साहो या नव्या सिनेमासाठी काम करतोय. हा सिनेमा तीन भाषांमध्ये बनवला जातोय. तामिळ, तेलुगु आणि हिंदीमध्ये हा सिनेमा बनवला जातोय.