Karan Johar on Trolled: करण जोहरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्याला ट्रोलर्सही अनेकदा ट्रोल करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावर KJo हा चांगलाच चर्चेत असतो. यावेळी मात्र त्यानं आपल्याला होणाऱ्या या ट्रोलिंगवरून ट्रोलर्सना चांगलेच सुनावले आहे. यावेळी त्यानं एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे. गेली अनेक वर्षे कंगना राणावत त्याला टार्गेट करताना दिसते आहे. हा मूव्ही माफिया आहे. नवीन येणाऱ्या लोकांना तो कधीच संधी देत नाही. सोबतच त्यांचे सिनेमेही पाडायचा प्रयत्न करतो. घराणेशाहीला चालना देतो. असे अनेक आरोप कंगनानं केले आहेत. परंतु यावेळी करण जोहरनं ट्रोलर्सना चांगलाच धडा शिकवला आहे. गेल्या 7-8 वर्षांत सोशल मीडियावर ट्रोल होण्याचे प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढले आहे. खासकरून 2020 च्या लॉकडाऊननंतर तर याचे प्रमाण हे प्रचंड वाढलेले दिसते आहे. त्यामुळे याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली होती. मराठी कलाकारही अनेकदा ट्रोल होताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द इंडियन एक्सप्रेस'च्या 'एक्स्प्रेस अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपल्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी त्यानं आपल्याला होणाऱ्या ट्रोलिंगवरून हेटर्सना खडेबोल सुनावले आहे. तो म्हणाली की, ''बॉलिवूडमध्ये काहीही घडलं की त्याचा दोष मलाच दिला जातो. काही झालं तर मलाच ट्रोल केले जाते आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नावाच्या पुढे सापाचा इमोजी टाकला जातो. मला हे आठवत नाही की हे सगळं नक्की कधी सुरू झालं. मी ट्विटरवर नाही. परंतु तो सापाचा इमोजी बरेच यूझर्स वापरतात, याची मला कल्पना आहे.'', अशी कबूली त्यानं यावेळी दिली. 


 तो पुढे म्हणाला की, या इंडस्ट्रीमध्ये काही घडलं तरी मला फार ट्रोल केले जाते. माझ्यासाठी सोशल मीडियावर नानाविध, असंख्य कमेंट्स येतात. मी ट्विटवर नसल्यानं इन्स्टाग्रामवर कमेंट्समधून मला ट्रोल करत होते. मध्यंतरी त्या सर्व कमेंट्स वाचून माझ्यावर परिणामही होत होता. जर माझा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट जर फ्लॉप झाला असता तर ट्रोलर्स पुन्हा सक्रिय झाले असते.'' असं तो म्हणाला. 


गौरव मोरेचा नवा हेअरकट पाहिलात? : गौरव मोरेचा नवा हेअरकट; नेटकरी म्हणाले, ''याच्या केसाला कुणी धक्का लावला?''


''आता मला याची जाणिव झाली आहे की या सगळ्या गोष्टी आभासी आहेत त्याला आपण ंथंबीरपणे तोंड द्यायला हवं. माझ्या फोटोंवर अजूनही फार विचित्र कमेंट्स लोकं करत असतात. मी आता पुर्वीसारखं लक्ष देत नाही. या ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचून मला अनेकदा आश्चर्य वाटतं की यांच्याकडे एवढी नकारात्मकता कुठून येते हेच मला समजतं नाही?'', असे स्पष्ट मतं त्यानं यावेळी दिले.