मुंबई : टीव्हीचं आवडतं कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा खूप चर्चेत असतात. बिग बॉस 15 पासून करण आणि तेजस्वी चाहत्यांवर वर्चस्व गाजवत आहेत. करण आणि तेजस्वी कायम लाइमलाइटमध्ये असतात आणि चाहते त्यांना खूप लाईक करतात. दोघंही अनेकदा डिनर डेटवर स्पॉट होतात. ज्याचे फोटो खूप व्हायरल होतात. सोशल मीडियावर चाहते करण आणि तेजस्वीला 'तेजरन' म्हणतात. करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांनी त्यांना एक खास सरप्राईज दिलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाने एक स्टार विकत घेऊन कपलला गिफ्ट केला आहे. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघांचे काही चाहते एअरपोर्टवर करण-तेजस्वीची वाट पाहत आहेत आणि त्यांना सरप्राईज द्यायचं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


स्टारला दिलं हे नाव
चाहत्यांनी खरेदी केलेल्या या स्टारचं नाव तेजरान ठेवलं आहे. ती  व्हिडिओमध्ये डेटाबेस आणि स्टारचं मॅपिंग दाखवत आहे. या स्टारवर करण आणि तेजस्वीची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर करण आणि तेजस्वी नक्कीच खूप उत्साहित होणार आहेत.