मुंबई : ‘कारभारी लयभारी’ ह्या झी मराठीवरच्या नवीन मालिकेच्या प्रोमो रिलीझ नंतर ह्या मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली, प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकाराची उभ राहण्याची आणि भाषणाची स्टाईल पाहता, हि मालिका राजकारणावर भाष्य करणारी आहे असे वाटते. या मालिकेचं लेखन तेजपाल वाघ ने केलं असून किरण दळवी या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. तर 'देवमाणूस' ह्या मालिकेचे संवाद लेखक विशाल कदम यांनी या मालिकेचे देखील संवाद लिहिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतच प्रसारित झालेल्या "डोळ्यात जाळ हाय, दुश्मनाचा काळ हाय काळीज कापतंय नजरेची सूरी, आला आला कारभारी लयभारी...!" या मालिकेच्या शीर्षक गीताला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळतेय. या शीर्षक गीताला पंकज पडघन यांनी संगीत दिलं असून, शाहीर देवानंद माळी यांनी हे गीत गायलंय, तसेच या शीर्षक गीताचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे सुलोचना चव्हाणांचे चिरंजीव प्रसिद्ध ढोलकी वादक विजय चव्हाण यांनी ह्या शीर्षकगीताची तालवाद्य वाजवली आहेत.



यामालिकेत प्रमुख भूमिकेत निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाते हि जोडी दिसणार आहे. तेव्हा पाहायला विसरूनका २ नोव्हेंबरपासून “कारभारी लय भारी” सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. आपल्या झी मराठीवर.