करीना, भूमी की शहनाज... निर्मात्याने टॉपलेस फोटो शेअर करून उत्सुकता वाढवली!

पोस्टरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अनेकजण या अभिनेत्रीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. या सिनेमाचं पोस्टर निर्माते करण बुलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये सिनेमा रिलीजचा हंगाम सुरु आहे. गदर २, ओएमजी, ड्रीम गर्ल, ताली, घुमर हे अपकमिंग सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. तर नुकतीच रणवीरच्या 'डॉन ३' घोषणा करण्यात आलीये. या पाठोपाठ अजून एका सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचं नाव 'थँक्यू फॉर कमिंग' असं आहे. या सिनेमाचं पोस्टर निर्माते करण बुलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मात्र या पोस्टरमध्ये अभिनेत्री पाठमोरी दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिचा टॉप काढताना दिसत आहे. या अभिनेत्रीचा बोल्डनेस चाहत्यांना भलताच आवडल्याचं दिसत आहे.
पोस्टरमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. अनेकजण या अभिनेत्रीविषयी चर्चा करताना दिसत आहेत. तर पोस्टरमध्ये दिसत असणारी ही अभिनेत्री पंजाबी स्टार शहनाज गिल असू शकते असं काहींचं म्हणणं आहे. तर काहीजण म्हणत आहेत की, ही अभिनेत्री भूमी पेडणेकर असू शकते. तर काहींचं म्हणणं आहे की, ही अभिनेत्री करिना कपूर आहे. त्यामुळे ही अभिनेत्री नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
शहनाज आणि भूमीचं नाव असण्यामागे कारण की, या पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी त्यात या दोन्ही अभिनेत्रींना टॅग केलं आहे. तर करिनाने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्यामुळे या सिनेमात करिनाचंही नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. मात्र या तिघींनपैकी या सिनेमात कोण झळकेल की, अजून कोणी दूसरीच अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत असेल. हे येणार काळच ठरवेल. शहनाज गिलनेही हे पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
शहनाजची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी शहनाजच्या या पोस्टवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या फोटोवर कमेंट करत शहनाजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र या पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा चेहरा दिसत नसल्याने ही अभिनेत्री कोण असेल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
शहनाज विषयी बोलायचं झालं तर, बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाबी स्टार शहनाज गिल सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. अभिनेत्रीचे हॉट लूक अनेकदा इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. बिग बॉसपासून शहनाजच्या जीवनशैलीत आणि लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. यासोबतच अभिनेत्री आता खूप स्टायलिश आणि हॉट दिसायला लागली आहे. सध्या शहनाज तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे.