मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कूमार आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांनी १० एप्रिलला आयोजित केलेल्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्डमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रेटींपासून ते समाजसेवकांपर्यंत सर्वांना सन्मानित करण्यात आले. 


करिनाचा एथिनिक लूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्यक्रमात करिना कपूर खान एथिनिक लूकमध्ये दिसली. पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीत ती अत्यंत सुंदर दिसत होती. करिनाची ही साडी मसाबा गुप्ता यांनी डिझाईन केली होती.
करीनाला येथे पावर आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अक्षय कुमारचा सामाजिक प्रभावक या पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.



या कलाकारांची उपस्थिती


देवदास सिनेमातून आपल्या गायनाच्या करिअरला सुरुवात करणारी गायिका श्रेया घोषाल हीचा देखील सत्कार करण्यात आला. श्रेयाचा सर्वोत्कृष्ठ गायिका या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला दिग्गज अभिनेता जितेंद्र यांनीही उपस्थिती लावली.