मुंबई : अभिनेत्री करिना कपूर पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. ऑक्टोबर २०१२ मध्ये करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं. तसं, पतौडी कुटुंबाची सून होण्याआधी करीना आणि शाहिद कपूरच्या अफेअरच्या बातम्यांची खूप चर्चा झाली होती. शाहिद कपूरसोबत करीनाची लव्हस्टोरी 'फिदा' चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली. करीनानेच शाहिदला प्रपोज केलं होतं. ही गोष्ट स्वत: करीनाने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कबूल केली होती. तिने सांगितलं होतं की अनेक फोन कॉल आणि मेसेजनंतर शाहिदने तिचा प्रस्ताव स्वीकारला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2004 मध्ये सुरू झालेल्या शाहिद-करीनाची लव्हस्टोरीसुद्धा माध्यमांसाठी चर्चेचा विषय बनली होती. दोघांना बर्‍याचदा एकत्र स्पॉट केलं जात होतं. एवढंच नव्हे तर या दोघांनीही आपलं नात जाहीरपणे स्वीकारलं होतं. मात्र या दोघांच्या नात्यात तेव्हा दुरावा आला जेव्हा हे दोघंही 'जब वी मेट' या चित्रपटात काम करत होते.


2006 मध्ये जेव्हा 'जब वी मेट' चित्रपटाच्या शूटिंगला दोघांनी सुरुवात केली तेव्हा त्यांचे चांगले संबंध होते. पण चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्या नात्यात पेच फुटला. या चित्रपटाच्या संबंधित लोकांनी सांगितलं की, सेटवर या दोघांमधील संभाषण देखील कमी होऊ लागलं होतं.


'जब वी मेट' चित्रपटाच्या शेवटच्या सीनच्या शूटिंगसाठी जेव्हा दोघं सेटवर पोहोचले तेव्हा ते वेगवेगळ्या गाडीतून आले. बातमीनुसार शाहिद-करीनाच्या ब्रेकअपमागे अभिनेत्री अमृता राव हे कारण असल्याचं मानलं जातं होतं. असं म्हटलं जातं की, 'विवाह' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहिदची अमृता रावशी जवळीक वाढू लागली आणि करिनाला शाहिदविषयी संशय येवू लागला. करीना-शाहिदच्या ब्रेकअपमागे अभिनेत्रीची बहीण करिश्मा कपूर यांनाही जबाबदार धरलं जात होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार असंही म्हटलं जातं की, करिश्माला शाहिद कपूर आवडत नव्हता.



2007मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये करीना सैफ अली खानसोबत दिसली तेव्हा शाहिद करिनाच्या नात्याचा शेवट झाला यावर शिक्कामोर्बत झालं. असं म्हणतात की, ब्रेकअपसाठी शेवटचा हा फोन शाहिदच्या बाजूने केला गेला होता. तर करीनाने ब्रेकअप झाल्यानंतरही कित्येकदा पॅच अप करण्याचा प्रयत्न केला.


शाहिद कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर करिना कपूरने स्वत:पेक्षा 10 वर्षांनी मोठा असलेल्या सैफ अली खानचा हात धरला. 16 ऑक्टोबर 2012ला दोघांनी लग्न केलं. मात्र, यापूर्वी करीना आणि सैफ 5 वर्ष एकमेकांसोबत लिव्ह-इनमध्ये होते. सैफने यासाठी करीनाची आई बबिताकडे परवानगी मागितली होती हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल.


करीना शाहिद कपूरसोबत बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. यात '36 चायना टाऊन', 'चूप चुपके', 'जब वी मेट' या सिनेमांचा सामावेश आहे. या दोघांच्या ब्रेकअपनंतर त्यांचा 'मिलेंगे-मिलेंगे' हा चित्रपट २०१० मध्ये आला होता. त्याचवेळी करीना सैफसोबत तशनमध्ये दिसली.