मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. सिनेमात सारा सोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत आहे. साराच्या पर्दापणाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. म्हणूनच सारा आणि तिचे कुटुंबियही पर्दापणाबद्दल अत्यंत सर्तक आहेत. 


करिना घालतेय जातीने लक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी केदारनाथच्या शूटिंगला उशीर झाल्यामुळे साराची आई अभिनेत्री अमृता सिंग चांगलीच भडकली होती. इतकंच नाही तर अमृता सिंगने चक्क दिग्दर्शक अभिषेक कपूरची भेट घेतली. त्यानंतर सैफ अली खान हे प्रकरण शांत केले.
फक्त अमृता आणि सैफचं नाही तर साराची स्पेट मॉम करिना कपूर देखील तिच्या पर्दापणाबद्दल खूप उत्सुक आहे. करिना, साराच्या लूक आणि ग्रुमिंगकडे स्वतः लक्ष देत आहे.


खास लूक, स्पेशल मेकअप


केदारनाथ मधील साराचा लूक करिनाला काही खास आवडला नाही. म्हणूनच साराच्या नवा आगामी सिनेमा सिम्बासाठी साराच्या लूकची जबाबदारी करिनाचे मेकअप आर्टिस्ट पॉम्पी सांभाळत आहेत. केदारनाथ सिनेमातील क्लायमेक्स सीनमध्ये साराचा मेकअप पॉम्पीने केला आहे. क्लायमेक्स सीनमध्ये अपेक्षित असलेला खास लूकसाठी मेकअपची गरज होती.



केदारनाथनंतर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला


सिम्बा सिनेमात सारा आणि रणवीर सिंग ही जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टीने केले असून सिनेमाच्या फर्स्ट शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहेत.