मुंबई : 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाचं फर्स्ट लूक रिव्हील होताच चर्चेत आली ती करीना कपूर आणि तिची फिगर... आफ्टर प्रेग्नसी करीनाचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्यामुळे करीनाने यासाठी खूपच मेहनत घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वीरे दी वेडिंग' सिनेमाचा हा फर्स्ट लूक रिव्हील होताच सिनेमाबद्दल बीटाऊनमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येतेय. विशेष म्हणजे सिनेमाचं पोस्टर इतकं फ्रेश वाटतंय तितकाच सिनेमातल्या पोस्टरमधला करीनाचा लूकही फ्रेश वाटतोय... तैमूरच्या जन्मानंतर करीनाचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे या सिनेमाबद्दल करीनालाही खूपच उत्सुकता आहे... विशेष म्हणजे प्रेग्नसीनंतर पुन्हा बॉडी शेपमध्ये येण्यासाठी करीनाने दिवसातले जवळजवळ १० तास वर्क आऊट केलंय. जिथे मिळेल तिथे करीना वर्कआऊट करताना दिसत होती. 


तैमूर सहा महिन्यांचा झाल्यानंतर करीनाने या सिनेमाच्या शुटींगला  सुरुवात केली...शूटींगच्या प्रत्येक दिवशी करीना तैमुरला सेटवरही घेऊन जात होती...आणि विशेष म्हणजे या सिनेमात तैमुरही एक छोटीशी भूमिका साकारणार आहे. 


सिनेमाचं ऑनलोकेशन, सिनेमाचे फोटो आता व्हायरल होतायत तशी सिनेमाची उत्सुकता, चर्चा अधिक होतेय. खरंतर करीना प्रेग्नंट असतानाच हा सिनेमा तिच्याकडे आला होता...


'रियाचा हा प्रस्ताव माझ्यासाठी धक्काच होता. या सिनेमातल्या भूमिकेसाठी मी फिट नाही, असं मला वाटतं होतं. माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेली एखादी हिरोईन या सिनेमासाठी निवडावी अशी विनंती मी रियाकडे केली. मी प्रेग्नंट असल्याचंही रियाला सष्टपणे सांगितलं. मात्र, रियाने ते मान्य केलं नाही... ही महिलांची कथा आहे आणि तुझ्याशिवाय मी दुस-या कोणालाही घेणार नाही असं सांगून तिने मला नि:शब्द केलं...' असं करीनानं म्हटलंय. 


रियाला शब्द दिल्याप्रमाणे आपली फिगर मेंटन करत प्रेग्नसीनंतर करीना पुन्हा एकदा अभिनयासाठी सज्ज झाली... तसं पाहता करीनाने आपली प्रेग्नसीही खूप एन्जॉय केली... अगदी नवव्या महिन्यापर्यंत... मग ते रॅम्प वॉक असो... फोटो शूट असो किंवा कोणत्या पार्टीतला अपियरन्स असो... आणि म्हणूनच आत्ताही करीना आफ्टर प्रेग्नसी पुन्हा एकदा मेहनतीने आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झालीय. ती ही बॉलिवूडच्या गर्ल गँगसोबत...