Kareena Kapoor पुन्हा ट्रोल; यंदा नेटकऱ्यांना `या` गोष्टीवर आक्षेप
मात्र या फोटोंमुळे करीना कपूर खान बऱ्याचदा ट्रोल (trolled) सुद्धा झाली आहे. आज पुन्हा एकदा ट्रोलर्सने तिला लक्ष्य केले आहे.
Kareena Kapoor Ganesh Celebration: बॉलिवूडची (Bollywood) ‘बेबो’ म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान (Actress Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रीय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट (Kareena kapoor Khan Photos) करते. या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंतीही मिळते. मात्र या फोटोंमुळे करीना कपूर खान बऱ्याचदा ट्रोल (trolled) सुद्धा झाली आहे. आज पुन्हा एकदा ट्रोलर्सने तिला लक्ष्य केले आहे. करीनाने शेअर केलाला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सगळीकडे बाप्पाला निरोप देण्यात येतो आहे. अख्ख देश गणरायाच्या भक्तीमध्ये तलीन (Ganesh Celebration) झालं आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. अशातच करीना कपूरने इंस्टाग्रामवर (Instagram) दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती गणपती बाप्पासमोर पोज देताना दिसत आहे. फोटोंमध्ये तिचा धाकटा मुलगा जेह (jeh) देखील तिच्यासोबत दिसत आहे. (kareena kapoor khan again troll on social media)
करीना कपूरने फोटो शेअर करताना हार्ट आणि हँड इमोजी शेअर केल्या आहेत.तर या पोस्टवर नंनद सबा पतौडी यांनी कमेंट केली आहे.तिने लिहिले आहे की, 'वहिनी आणि संपूर्ण कुटुंबाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. जेहचे चेहऱ्यावरील भाव खूपच क्यूट.' करीना कपूरचा हा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. एका तासात याला 203000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर फोटोंवर 810 कमेंट्स आल्या आहेत. याच फोटोंमुळे करीना कपूरला ट्रोल झाली आहे.
या फोटोंमुळे करीना कपूरलाही ट्रोल केले जात आहे. एका ट्रोलरने लिहिले आहे की, 'आता हे सर्व दाखवून काही फायदा नाही.' तर एकाने लिहिले आहे की, 'कधीतरी ईदचेही असे फोटो पोस्ट करायला हवे होते.' असे लिहिले आहे. एकाने लिहिले आहे, ‘काहीही केले तरी बहिष्कारच राहणार आहे.’ तर अनेकांनी करीना कपूरच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजीही शेअर केले आहेत.जय श्री गणेश असेही लिहिले आहे. काहींनी गणपती बाप्पा मोरया असे लिहिले आहे.