मुंबई : करीना कपूर खान बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. वीरे दी वेडिंग, जब वी मेट, 3 इडियट्स, बॉडीगार्ड सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या उत्कृष्ट कामासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करीना एका चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी फी वाढवण्याच्या मागणीवरून चर्चेत आहे. बातमीनुसार, तिने या भूमिकेसाठी भरमसाठ फीची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीनाने मागितली 12 कोटी फी 
एका सूत्रानुसार, करीनाने चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आणि तिच्या या मागणीनंतर निर्माते आता तिच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहेत. सोशल मीडियावरही करीनाला या मागणीसाठी खूप ट्रोल करण्यात आलं आहे.


करीनाने मुलाखतीत केला हा खुलासा 
त्याचबरोबर अलीकडेच करीनाने या प्रकरणावर मौन सोडलं आहे. तिने सांगितलं, काही वर्षांपूर्वी, चित्रपटात पुरुष किंवा स्त्रीला समान वेतन मिळण्याविषयी कोणीही बोलत नव्हतं. मात्र आता आपल्यापैकी बरेच जण याबद्दल उघडपणे बोलत आहेत.


महिलांना आदर मिळाला पाहिजे - करीना
पुढे करिना म्हणाली की, मला काय हवं आहे ते मला सांगायचं आहे आणि मला असं वाटतं की, महिलांना आदर दिला पाहिजे. हे मागणी करण्याबद्दल नाही, ते महिलांच्या सन्मानाबद्दल आहे आणि मला वाटतं की, गोष्टी बदलल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला सांगू की, करीना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. दोघांच्या शूटिंगचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.