Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan : बॉलिवूडमधील कपूर आणि खान कुटुंब हे चांगलंच चर्चेत असतात. या दोन्ही कुटुंबातील जवळपास सगळेच लोक ही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. प्रयत्येक पिढीत कोणी ना कोणी आहे जो त्यांच नाव हे पुढे घेऊन जातं. त्यातील एक करीना कपूर आणि सैफ अली खान हे जोडपं. सैफ अली खाननं अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर करीना कपूरशी लग्न केले. त्यांना दोन मुलं असून तैमुर आणि जेह अशी त्यांची नावं आहेत. करीना ही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांची सावत्र आई असली तरी त्यांच्याशी खूप क्लोज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा अली खान आणि इब्राहिम हे अनेकदा सैफ आणि करीनासोबत एकत्र स्पॉट होतात. कुटुंबात कोणाचाही वाढदिवस असला किंवा काही सण असला तरी हे संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. इतकंच नाही तर सारा आणि इब्राहिम हे दोघेही तैमुर आणि जेहचे लाड करतात. रक्षाबंधन असो किंवा मग भाऊबीज सारा आणि इब्राहिम सैफ-करीनाच्या घरी पोहोचतात. करीना त्यांची सावत्र आई असली तरी ते तिला आई म्हणून हाक मारत नाहीत. एका मैत्रिणीसारखे तिच्यासोबत राहतात. तर त्याचप्रमाणे करीना देखील त्यांच्यासोबत वावारते. करीनानं इब्राहिमला तर एक टोपण नाव देखील दिलं आहे. त्याच नावावनं ती त्याला हाक मारते.



करीना इब्राहिमला इग्गी या नावानं हाक मारते. करीना आणि इब्राहिम यांचं संबंध खूप चांगले आहेत. ते दोघे एकमेकांचा खूप आदर करतात. फक्त करीना नाही तर सारा देखील त्याला इग्गी पण इग्गी पॉटर म्हणून हाक मारते. मात्र, इब्राहिमला या नावाची चिड आहे. करीनानं फक्त इब्राहिमलाच नाही तर सासू शर्मिला टागोर यांना देखील टोपण नाव दिलं आहे. त्यांना ती प्रेमानं मां इन लॉ अशी हाक मारते. तर तैमुर शर्मिरा यांना बड्डी अम्मा म्हणून हाक मारतो. 


हेही वाचा : सानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत जोडले होते नाव! आता 'या' अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा


दरम्यान, सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाल्यापासून सारा आणि इब्राहिम हे दोघेही त्यांच्या आईसोबत राहतात. करीनानं सैफशी लग्न केल्यानंतर ती आणि अमृता सिंग कधी भेटले नाही. मात्र, अमृतानं साराला सैफच्या लग्नात जाण्यापासून रोखलं देखील नाही. तिनं स्वत: साराला तयार होण्यास मदत केली होती.