मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच सगळ्यांचं लक्षवेधून घेते. करीना कपूर खान एक फॅशन आयकॉन आहे आणि तिच्या फॅशन स्टेटमेंट्सची नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूर खान जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा तिने केलेल्या स्टाईलिंगची सर्वात जास्त चर्चा रंगते. आताही असेच काहीसे घडले आहे.


सध्या करीना कपूर खान तिच्या कुटुंबासाठी पूर्ण वेळ देत आहे. नुकतीच बेबो तिचा मोठा मुलगा तैमूर अली खानला शाळेत सोडण्यासाठी पोहोचली.


लॉकडाऊननंतर सर्वांची शाळा आणि कॉलेज सुरू झाली आहेत. आता सर्व मुले शाळेत जाऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत करीना स्वतः तिचा मुलगा तैमूरला शाळेत सोडण्यासाठी पोहोचली. 


नेहमीप्रमाणेच करीना कपूरला पाहण्यासाठी फोटोग्राफर्सने मोठी गर्दी केली. अशा परिस्थितीत करीना कपूर खानच्या लूकची बरीच चर्चा होत आहे.


जेव्हा करीना कपूर आपल्या मुलाला हॉट पँट घालून शाळेत सोडण्यासाठी पोहोचली, तेव्हा सर्वजण तिच्याकडे बघतच राहिले. करीना कपूर मुलगा तैमूरला शाळेची बॅग देत असताना तिचे फोटो काढण्यात आले.यावेळी तिच्या आऊटफिटची सर्वात जास्त चर्चा रंगली.



युनिफॉर्ममध्ये तैमूर कमी वेळाच स्पॉट झाला आहे. सध्या आई आणि मुलाचे हे फोटो खूपच चर्चेत आहेत. 21 फेब्रुवारी 2021 रोजी करीना कपूरने तिचा दुसरा मुलगा जहांगीरला जन्म दिला. काही दिवसांनी जहांगीरला एक वर्ष पुर्ण होणार आहे. जहांगीरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.