मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा 7 वा सीझन सुरू झाला असून प्रेक्षकांना तो आवडत आहे. या शोचे तीन एपिसोड आले आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. केवळ बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य कलाकारही सीझनमध्ये सहभागी होत आहेत. इथे हजेरी लावत कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधीत अनेक खुलासे करतात. यासगळ्यात प्रेक्षक अनेक सेलिब्रिटींच्या आयुष्याशी संबंधीत मजेदार खुलासे करताना दिसतात. या कलाकारांच्या यादीत विकी कौशल, कतरिना कैफपासून अनेक लोकप्रिय कलाकारांची नावं आहेत. यासगळ्यात बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती लवकर शोमध्ये येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूरनं तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा स्टायलिश अवतार पाहायला मिळत आहे. तिने ब्लॅक ब्रॉलेट आणि ट्राउझर्स परिधान केले असून त्यावर काळ्या रंगाचं ब्लेझर परिधान केलं आहे. मोकळे केस आणि कमीत कमी मेकअपमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. करीनाच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. पण यासोबतच या फोटोंचं कॅप्शन देखील चर्चेत आलं आहे.



करीनानं हे फोटो शेअर करत लिहिलं, ‘मला माझी ब्लॅक कॉफी खूप आवडते.’ यासोबतच तिने काळ्या रंगाच्या हार्ट इमोजीचाही वापर केला आहे. करीनाच्या या कॅप्शनवरून ती लवकरच ‘कॉफी विथ करण ७’मध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.


दरम्यान रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी ‘कॉफी विथ करण 7’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. या दोघांनी त्यांच्या वैवाहिक आणि सेक्स लाइफबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. याशिवाय सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांचा दुसरा एपिसोडही बराच गाजला होता.


आता करीनाच्या या पोस्टनंतर ती पुढच्या आठवड्यात 'कॉफी विथ करण'च्या पाचव्या एपिसोडमध्ये हजेरी लावू शकते असं बोललं जात आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.