करीनाच्या सांगितलेल्या तिसऱ्या अपत्याच्या वादग्रस्त नावावरुन करीना कपूर चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतंच तिचं पुस्तक लाँन्च केलं
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतंच तिचं पुस्तकाचं लाँन्च केलं. करीना कपूर खानच्या या पुस्तकाचं नाव आहे प्रेग्नन्सी बायबल. या पुस्तकाचं करीनाचे चाहते आणि तिचा मित्र परिवार कौतुक करत आहे. मात्र दुसरीकडे आता करिना कपूर खान या पुस्तकामुळे कायदेशीर अडचणीत सापडली आहे. करीना कपूरच्या या पुस्तकाच्या नावावरुन अखिल भारतीय अल्पसंख्याक मंडळाने आक्षेप घेतला आहे.
एका वृत्तानुसार, अखिल भारतीय अल्पसंख्याक मंडळाने या पुस्तकाच्या नावाला विरोध दर्शवत अभिनेत्री विरोधात तक्रार दाखल करण्याचा विचार केला आहे. अखिल भारतीय अल्पसंख्याक मंडळाचे अध्यक्ष डायमंड युसुफ म्हणाले की, करिनाच्या या पुस्तकाच्या नावावर असलेल्या गर्भधारणेच्या बायबलवर त्यांचा आक्षेप आहे.
करीना कपूर खानच्या पुस्तकावर उडाला गोंधळ
या बद्दलची बैठक कानपूरच्या चुन्नीगंज स्मशानभूमीत बोलविली होती. या बैठकीला बर्याच लोकांनी हजेरी लावली. या बैठकीत करीना कपूर खानच्या पुस्तकाच्या नावाचा निषेध करण्यात आला होता आणि ते या प्रकरणात खटला दाखल करतील असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याआधीच ते त्यावर कायदेशीर सल्ला घेतील. सध्या या वादावर करीना कपूर खानचं कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करिनाने हे पुस्तक दुसर्या मुलाच्या जन्मानंतर लिहिलं आहे. ज्यात तिने तिच्या दोन्ही गर्भधारणेचे अनुभव सांगितले आहेत.
या पुस्तकाची घोषणा करिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. करिनाने या पुस्तकाला तिची तिसरी गर्भधारणा म्हणून संबोधलं आहे. पुस्तक लॉन्च होताच हे पुस्तक एक बेस्टसेलर बनलं आहे.
या पुस्तकाद्वारे लेखिका बनलेल्या करीना कपूरने लिहिलंय की, ''हा माझा प्रवास आहे. माझी गर्भधारणा आणि माझं प्रेग्नंसी बायबल. करिनाने पुढे लिहिलं आहे की, मी काम करण्यास कशी उत्सुक असायचे आणि कधीकधी माझ्यासाठी अंथरुणावरुन उठणंही कठीण व्हायचं.
हे पुस्तक माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. कारण यामध्ये मी माझ्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान माझा शारीरिक आणि भावनिक अनुभव शेअर केला आहे. बर्याच प्रकारे हे पुस्तक माझ्यासाठी माझ्या तिसर्या मुलासारखंच आहे.''