मुंबई : कलाविश्वात सध्या अनेकांच्या घरी नवे पाहुणे आले आहेत. रविवारी अभिनेत्री करीना कपूर खानने देखील तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. कपूर आणि खान कुटुंबाने या नव्या पाहुण्याचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं. मंगळवारी करीना रूग्णालयातून घरी आली. करीना आणि सैफने त्यांच्या पहिल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्यांच्या दुसऱ्या बाळाची झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, करीना, सैफ आणि तैमुर घरी परतत असताना छोट्या बाळाचा फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फोटोमध्ये कपूर आणि खान कुटुंबातील नव्या पाहुण्याला एका कापडामध्ये गुंडाळलेलं आहे. रूग्णालयातून बाहेर पडत असताना पैपराजीने हा फोटो घेतला आहे. सध्या करीनाच्या दुसऱ्या बाळाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 



करीनाने रविवारी ब्रिज कँडी रूग्णालयात दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी रात्री करीनाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे करीना आणि सैफने दुसऱ्या बाळाच्या जन्मा आधी सर्व काम पूर्म केलं आहे. 



दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सैफने अधीकृत घोषणा केली होती. 'आशीर्वादाच्या स्वरूपात आम्हाला मुलगा झाला आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर आहे. तुम्ही दिलंले प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार..' असं वक्तव्य सैफने दिलं.