मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) दुसऱ्या मुलाचे फोटो पाहण्यास चाहते खूप आतुर होते. अखेर महिला दिनाच्या निमित्ताने करीनाने दुसऱ्या मुलाचा फोटो (Kareena Shared second Baby Photo)शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने खूप छान कॅप्शन देखील लिहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीनाने मुलासोबत सेल्फी घेत लिहिलं आहे की,'असं काहीच नाही जे एक महिला करू शकत नाही. Happy Womnes Day माझ्या प्रेमळ व्यक्तींनो....' या सोबतच तिने #InternationlWomensDay असा हॅशटॅग वापरला आहे. (Women's Day : विराटकडून लेक वामिकाला महिला दिनाच्या खास शुभेच्छा) 



करीना कपूरने फोटो शेअर करताच तो थोड्या वेळात व्हायरल झाला आहे. या फोटोत करीनाने बाळाचा फोटो दाखवलेला नाही. मात्र चाहत्यांना हा फोटो अतिशय आवडला आहे. सोबतच सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तेसच कलाकारांनी देखील या फोटोवर कमेंट केले आहेत. सैफने या फोटो खाली लिहिलं आहे की,'तुम्ही शानदार महिला आहात.... लव यू'