मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधताना दिसते. करीनाची मुलं तैमूर आणि जहांगीर हे स्टार किड्स असले तरी त्यांनी लोकप्रियता ही कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. करीनानं नुकताच तैमूर विषयी एक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमूरनं आपल्या क्यूटनेसनं सर्वांचे मन जिंकले आहे. तैमूर लहान वयातच सोशल मीडिया सेन्सेशन बनला. तैमूरचे अनेक फोटो करीना स्वतः सोशल मीडियावर शेअर करत असते. आता करीनानं तिच्या मुलाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. तिनं सांगितले की, तिच्या मुलांना आता फोटो काढायला आवडत नाही.  



एका मुलाखतीत , पापाराझी कल्चरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर करीना म्हणाली, 'तैमूर तिला विचारतो की पापाराझी त्याचे फोटो का क्लिक करतात, तैमूरला कळतं की तो लोकप्रिय नाही, म्हणून मी त्याला समजावून सांगितले.. हो तू फेमस नाहीस, आता तुला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आता तू लहान आहेस.' करीना पुढे म्हणते की, 'माझ्या मुलालाही समजू लागले आहे की मी प्रसिद्ध नाही. त्याला या सगळ्या गोष्टीचा राग येतो.' 


 करीनाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर लवकरच 'लाल सिंह चड्ढा' (Lal Singh Chaddha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत आमिर खानही दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासोबत अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपटही एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.


नुकतीच करीनानं दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ मध्ये हजेरी लावली. यावेळी करणनम अनेक खासगी प्रश्न विचारले, ज्यावर करीनानं स्पष्टपणे उत्तर दिले आहे. मुलं झाल्यानंतर करीनाची सेक्स लाईफ कशी आहे?कॉफी विथ करणच्या सातव्या पर्वात आमिर खान आणि करीना कपूर खान येत आहेत. या एपिसोडच्या प्रोमोच्या सुरुवातीला करण करीनाला विचारतो की, मुलांना जन्म दिल्यानंतर सेक्स लाईफ चांगली असते की नाही? यावर करीना म्हणाली की, ते तुला कळणार नाही.  हे ऐकून करण दंग झाला.