मुंबई : स्टार किडमध्ये तैमूर हा हॉट फेव्हरेट मुलगा आहे. तैमूरच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये तो चर्चेत असतो. पण या गोष्टी करिना आणि सैफ अली खानला न पटणाऱ्या आहेत. आपला मुलगा अगदी लहानवयातच इतका लोकप्रिय आणि चर्चेत राहणं त्यांना आवडत नाही. तैमूर अनेकदा कार्यक्रमात स्पॉट झाल्यावर लोकं त्याला नावाने हाक मारतात आणि तो देखील सहज त्यांच्या कॅमेऱ्यांकडे बघतो हे पालक म्हणून या दोघांना सतावणारी गोष्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हटलं जातंय की, करिना - सैफ अली खान तैमूरसोबत लवकरच लंडनला सुट्ट्यांसाठी जाणार आहेत. मात्र आपल्या फॅमिली फोटो शेअर करण करिनाला आवडत नाही. एका मुलाखतीत तिने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. जेव्हा एका मुलाखतीत करिनाला ती तैमूरला कमी वेळ देते असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की, माझ्या मुलासोबत माझा वेळ हा फक्त माझा असतो. याबाबत सोशल मीडियावर पब्लिकली मला काहीच सांगायच नाही. हे पण वाचा : तैमुरच्या जन्मानंतर असं बदललं सैफ-करिनाचं आयुष्य


 


 त्याच्यासोबत फोटो शेअर करत नाही त्याला एअरपोर्टवर कॅरी करत नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यासोबत वेळ घालवत नाही. माझा क्वॉन्टिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त विश्वास आहे. माझ्या मुलासोबत माझं कसं नातं आहे हे मला जगाला ओरडून सांगायची गरज नाही. अशाने तुम्ही वर्किंग व्युमनवर नको ते आरोप करत आहात. 


मीडिया रिपोर्टनुसार, करिना म्हणते की, तैमूर इतका लहान आहे की त्याला कळतही नाही की त्याला हाक मारून त्याचे फोटो काढले जातात. त्याचं नाव घेतल्यावर तो रिअॅक्ट होतो. त्यामुळे आम्हाला त्याची जास्त काळजी वाटते.